गझल फार आवडली. सहज उतरली आहे.
जखम आत तर अजून ताजी आहे
दिसत जरी नसले वरवरचे व्रण...
उत्तर होते वेगळेच नजरेचे;
सांगितले ओठांनी खोटे कारण...
हे विशेष आवडले. शेवटचा शेरही छान झालाय. मिसऱ्यांची परस्परांशी असलेली वीण जितकी तर्कसंगत तितका शेर सुस्पष्ट होतो, हेच या गझलेतून दिसते आहे.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.
तुझ्याचखातर ऐवजी तुझ्याचसाठी असे सुचले.