मला तरी हा लेख लेखकाने विनोद म्हणून लिहीला आहे असे वाटले. पहिला परिच्छेद वाचून खुप हसायला आले.  सुनेला जाळणारी सासू  आणि हे दृश्य अगदी जवळून उत्सुकतेने  बघत असलेले नवरा, सासरा, दिर वगैरे पुरूष मंडळी नजरेसमोर आली.  बिचारे, मदत तरी कशी करणार सुनेला?  हात भाजतील ना त्यांचे?

लेखकाने शीर्षक देण्यात थोडी कंजुषी केली आहे.  शीर्षकात सा-सु-न-जा-भा वगैरे वगैरे, पण लेखात मात्र विविधता, एकता, लहानांचे प्रश्न वगैरे बऱ्याच बाबी उल्लेखलेल्या आहेत, ज्या इथे आहेत हे शीर्षक वाचून कळत नाही.

पुरूषप्रधान संस्कृती असलेल्या भारतात बायका सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत आणि पुरूष हतबल होऊन हे पाहताहेत?

साधना.