तुझा शोध तर अखंड चालू असतो
तुझ्याचखातर करतो आहे वणवण...
खूपच छान...
उत्तर होते वेगळेच नजरेचे;
सांगितले ओठांनी खोटे कारण...
सुंदर...सुंदर
...........................
अजब,
मक्ता अनाकलनीय आहे.
'अजब' आपली सवयच बदलत नाही
बदलू नाही शकलो दोघेही जण...
हे दोनजण कोण ? एक `अजब` म्हणजेच ही गझल लिहिणारा कवी (असे मी समजलो) आणि दुसरा कोण ? तुमच्यातील कवी वगळून जी कुणी व्यक्ती उरते, ती का ? गझलेच्या या शेवटच्या शेरातून हे काहीच स्पष्ट होत नाही.
या अनाकलनीयतेचे कारण आहे, तुम्ही वापरत असलेली (पण अजिबातच गरज नसलेली) `तखल्लुस`ची पद्धत. गतानुगतिकतेतून सगळ्यांनीच कधीतरी बाहेर पडायला हवे. त्या काळाला अनुरूप असणाऱया गोष्टी या काळाला अनुरूप असतीलच असे नाही. किंबहुना काही काही गोष्टी तर कालबाह्यच ठरतात. `तखल्लुस` हा त्यातलाच एक प्रकार. आजच्या घडीला तखल्लुस वापरण्याचे, पटेल असे किमान एक तरी कारण, मला सांगा. उर्दू गझलेचे / गझलकारांचे हे अंधानुकरण जबाबदार, संवेदनशील कवींनी (यात अर्थातच कवयित्रीही आल्याच !) टाळलेच पाहिजे. असो. राहवले नाही म्हणून लिहिले. पटल्यास विचार करावा. नाही पटले तर विसरून जायला आपण मोकळे आहातच. य़ा लिहिण्यामागील पोटतिडीक जरूर लक्षात घ्यावी, असा आग्रह मात्र मी जरूर जरूर धरीन.