मंगला चित्रपटगृहात दुपारी बारा वाजता, 'रेस' बघण्यासाठी साधारण बारा-चौदा वर्षाची मुलगी, तिच्यासोबत एक वयस्क आजी आणि त्या दोघांसोबत होता लहान पाच-सहा वर्षे वयाचा लहान मुलगा. पण, गेटकीपरने आजीला सांगितले की, त्या लहान मुलाला आणि त्या मुलीला सुद्धा आत सोडणार नाहीत कारण चित्रपट 'ए' सर्टिफिकेटचा आहे.

मग ती आजी मुलीला म्हणाली," अगं तो चित्रपट 'मोठ्यांचा' आहे ना. ते तुम्हा दोघांना सोडणार नाहीत आत."

मग निराशून ते तिघे घरी निघून गेलेत.....

मला नेमके काय म्हणायचे आहे ते या प्रसंगावरून तुम्ही समजू शकता...