लग्नसमारंभ मोठ्या उत्साहात पार पडून वधु आपल्या माहेरचा निरोप घेत असते... अर्थात वधुला प्रचंड रडू कोसळलेले असते. तिकडे नवरोबा मात्र मस्त खुषीत गाडीत बसलेले असतात.
आपल्या प्रभाकरपंतांसारखे एक जेष्ठ सुद्धा या समारोहास उपस्थित असतात व नकळत त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात... "शेवटचे रडणे आहे हे... या पुढे त्या चेहऱ्यावरचे हसू इकडे आणि त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात अशृ असणार आहेत."
---
ता.क. - मी वैयक्तीक कोणाचे नाव घेऊन कधिही लिहीत नसतो. हा विनोद लिहिताना नकळत प्रभाकरपंतांचे नाव मनात आले व तेच लिहिले (यातून माझे त्यांच्याबद्दलचे प्रेमच व्यतीत होते). परंतू जर हे अक्षेपार्ह वाटत असेल तर कृपया कळवा म्हणजे मी तिथे एखादे काल्पनिक नाव लिहिल.