राज हे केवळ निमित्तमात्र आहेत त्यामुळे मुद्दा कोणाचा या पेक्षा काय हे महत्त्वाचे. बेकारीचे म्हणाल तर राज्यात मोठ्याप्रमाणावर आहे आणि यात सुशिक्षित बेकार मोठ्या प्रमाणात आहे. आपले नेते किती गुंतवणुक आणली यातच खुष आहेत .या साठी शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या , बाहेरच्या लोकांनी कारखाने उभारायचे , काम करायलाही बाहेरील लोक. मग स्थानिंकानी करायचे काय ? आणि हा विकास काय कामाचा ?
मराठी भाषा आणि संस्कृती यावरसुद्धा सर्व बाजुने आक्रमण होत आहे. पण महाराष्ट्राने आपल्या हक्कांबाबत बोलणे म्हणजे संकुचीत पणा पण अशिच कृती अन्य ठिकाणी झाल्यास तो स्वाभिमानाचा हुंकार ठरतो.. त्यामुळे या विषयावर सार्वत्रिक पाठिंबा मिळणे अवघड आहे. त्यापेक्षा पुण्यात मिसळ कुठे मिळते यावर जास्त चर्चा होईल ( आता मुंबईबद्दल बोलायची सोय नाही.. आणि पुण्यातही ती बहुतेक काही दिवसांची सोबती असेल..). जे जे होईल ते ते पाहावे अजून काय