श्यामली, सुंदर कविता. खूप दिवसांनी एकदम लक्षवेधी लिहीलेस.
काही झाले तरी गाववाली आहे. मग ..

"सारे तुझ्यात आहे" हे नावही सुरेखच सुचवले आहेस जयावी ला.

किसू, तुमचेही काव्य आवडले. मलाही त्यावरून सुचले ..

लिहीत जातो कशास आपण?
अनुभव बोले शब्दच होऊन !

लिहीत जातो कशास आपण?
अनुभूती यावी वाचक होऊन !

लिहीत जातो कशास आपण?
सुहृदांस गुज करूया वर्णन !