पृथ्वीला संस्कृत-मराठीत जेवढे शब्द आहेत ती सर्व सामान्य नामे आहेत. परंतु त्यांतले अनेक शब्द आपण मुलींची नावे म्हणून ठेवतो आणि मग ती विशेषनामे होतात. पृथ्वीची संस्कृत नामे अशीः (विशेषनामे म्हणून वापरली जाणारी जाड ठशात):
अचला, अनंता, अब्धिवस्त्रा, अवनि(नी), इला, उर्वरा, उर्वी, काश्यपी, कीलिनी, कु, कुह्वरी, क्षमा, क्षरि, क्षिति, क्षोणि(णी), क्ष्मा, खंडिनी, गिरिकर्णिका, गिरिस्तनी, गोत्रा, ग्मा, घनश्रेणी, जगती, ज्या, दक्षा, धरणी, धरा, धरित्री, धात्री, नगाधारा, पृथिवी, पृथ्वी, पेरा, बीजसू, भू, भूतधात्री, भूमि, मही, मेदिनी, रत्नगर्भा, रत्नसू, रसा, वसुधा, वसुंधरा, वसुमती, विपुला, विश्वंभरा, विश्वा, सर्वभूता, सर्वंसहा, स्थगणा, स्थिरा, हेमा(.)
या नामात रेवा आलेले नाही. हाक मारताना रेवतीचे रे, रेवा, रेवू, रेवे, रेवते, रेवतीबाई... असे काहीही होऊ शकते, पण म्हणून त्याला भाषेतील शब्द म्हणता येणे अवघड आहे.