पोलीस तक्रार करा, सामाजिक संस्थांना कळवा.  अशा संस्था अनेक आहेत. ते आईबापांवर खटला दाखल करतील, मुलांवर, स्त्रियांवर  आणि वृद्धांवर अत्याचार करणे हा फौजदारी गुन्हा आहे. या आईवडिलांची माहिती वर्तमानपत्राला द्या, ते नाव न घेता प्रसिद्ध करतील, त्यांच्या घरी जाऊन वस्तुस्थिती तपासतील आणि तथ्य आढळल्यास मग नावानिशी प्रसिद्धी देतील.  पोलीस घरी येऊन आई-बापाला दम भरतील.

नुसते आपण काय करू शकतो म्हणून डोळ्यावर झापडे ओढून गप्प बसू नका. आपण जागरूक नागरिक आहोत हे मनाला पटवा आणि योग्य तेच करा. असे करणे हे समाजकार्यच आहे. उशीर करू नका.