प्रश्न खरे तर बिकट आहे, कारण हे जे काही चालले आहे, ते त्या कुटुंबापुरतेच मर्यादित आहे. आणि त्या अश्राप मुलावर ह्याचे परिणाम होत आहेत. कुणीही बाहेरच्या व्यक्तिने काहीही करतांना अर्थातच आपल्या कृतिने त्या मुलाच्या स्वास्थ्याला (अजून) इजा पोहोचणार नाही ह्याची खबरदारी घेतलेली बरी.
ह्या नवरा- बायकोतील निदान एकतरी व्यक्तीशी तुम्हाला संवाद साधता येत असावा? (म्हणजे ती 'ऍप्रोचेबल' असेल?). तुमच्या लिखाणाचा सूर बघता नवरा तसा असावा असे वाटते. तेव्हा त्याच्याशी सावधपणे संपर्क साधून त्याला त्या मुलाच्या बाबतीत थोडे सावध करावे. ह्यापुढील कार्य तुम्ही त्याच्याशी किती संवाद साधू शकता, तुमचा हेतू निव्वळ त्यांना मदत करण्याचा आहे, त्यांच्या खाजगी बाबीत ढवळाढवळ करण्याचा नाही, हे कितपत त्याच्या मनावर बिंबवू शकता ह्यावर अवलंबून राहील. तसे जर तुम्ही करू शकलात तर त्याला/ त्यांना कदाचित तुम्ही पुढील मार्ग (समूपदेशन इ.) दाखवू शकाल.
ह्या अत्यंत कठीण कार्यासाठी मन: पूर्वक शुभेच्छा.