बोन्साय करणे आणि बघणे मला हा मला क्रूरपणा वाटतो. बोन्सायकडे पाहताना मला एखाद्या दाढीमिशा फुटलेल्या पण शारीरीक वाढ खुंटलेल्या दोन-अडीच फूट उंचीच्या माणसाकडे पाहावे तसे वाटते. झाडांना तारा वगैरे करकचून बांधून त्यांची वाढ थांबवणे आणि मग त्यावर अकाली मातृत्व लादल्यासारखा एखादा आंबा, एखादा चिक्कू आणणे यात लोकांना सुंदर काय वाटते कुणास ठाऊक!