सकाळ आजकाल भयंकर विनोदी झाले आहे. काही दिवसांपूर्वी 'ह्यूमन ट्रॅफिकिंग'चे भाषांतर 'मानवी वाहतूक' असे केलेले वाचल्याचे आठवते. कोल्हापुरातील अग्रणी दैनिकाच्या कार्यालयात गेलो असता एका नवशिक्या मराठी पत्रकाराने नागपंचमीची बातमीचा अनुवाद करताना एक सहकाऱ्याला  "का रे स्नेक चार्मर म्हणजे सर्पप्रेमी ना रे?" असे विचारल्याचे आठवले. त्याच्या सहकाऱ्याने त्यावर बहुतेक होकारार्थी मान डोकावली होती.