या लेखातल्या प्रत्येक विधानातला फोलपणा राजने लेख प्रसिद्ध होण्याआधीच सिद्ध केला आहे.  ज्यांनी राजची भाषणे ऐकली नाहीत त्यांना या लेखातली वाक्ये ब्रह्मवाक्ये वाटत असतील, मला तसे वाटणे शक्य नाही. राज उत्तर भारतीयांविरुद्ध बोलतो, त्याने मारहाण करून अशांना महाराष्ट्राबाहेर हाकलले,  उत्तर भारतीयांचा महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी लोंढा(होळीसाठी गेलेले सर्वजण परत आले-इति पोलीस), अमिताभच्या घरावर बाटल्या फेकल्या, अमिताभने मुंबई सोडून जावे अशी विधाने केली इ.इ. हे सर्व पोलिसांनी आणि जनतेने खोटे सिद्ध केले आहे.  ज्यांना हे अजूनही खरे वाटते त्यांची कींव करण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. परवा दूरदर्शनच्या आयबीएन लोकमत या वाहिनीवर अमिताभने महाराष्ट्राकरिता काय काय केले हे सांगण्याची चढाओढ होती. त्यातली काही विधाने अशी: अमिताभने आपल्या कारकिर्दीतील पहिली मुलाखत हिंदी वर्तमानपत्राला नाही तर मराठी पत्राला दिली(इति निखिल वागळे), हे त्याचे महाराष्ट्रावर केवढे उपकार आहेत. (हे वाक्य वागळेंनी  किमान दहा वेळा ऐकवले. 'श्वास'ला पाठविण्याच्या खर्चासाठी लोकांनी देणग्या दिल्या त्यात अमिताभची देणगी पहिली होती(आमच्याही कार्यालयातल्या शिपायाच्या मुलीच्या लग्नाच्या भेटवस्तूसाठी जमा करायच्या देणगीदारांच्या नावातले पहिले नाव आमचेच असे.), स्टुडिओतल्या गरजू माणसांना तो मदत करतो, भोजपुरी चित्रपटाच्या मुंबईतील छायाचित्रणासाठी त्याने मराठी तंत्रज्ञांना  निर्मात्याकडे पाठवले(नाही तर त्यांना भोजपूरहून माणसे आणावी लागली असती.)  वगैरे वगैरे. आणि त्यानंतर दिवसभर अमिताभचे एकच वाक्य पुन्हापुन्हा दाखवत होते.  "मी फक्त देशाचेच कायदे पाळतो"(म्हणजे महाराष्ट्राचे पाळत नाही!). आणि दुसऱ्या दिवसापासून आणखी एकः "महाराष्ट्राकरिता मी काय केले ते सांगायला मी बांधील नाही." म्हणजे दुसऱ्यांना माहीत नाही आणि त्याला सांगायचे नाही, झाकली मूठ रिकामी.