हे तरू जणू बैरागी... वाव्वा!! नीरव शांततेत झाडं बैराग्यासारखी उभी आहेत. ही झाडे नक्कीच सागवानाची असावीत. नागपूरच्या सेमिनरी हिल्स भागात पौर्णिमेच्या मध्यरात्री अनेकदा एकटा फिरायचो. तिथे अनेकदा रातकिड्यांची किरकिर ऐकताना सागवान ऋचापठणच करताहात की काय असे वाटायचे.