पत्नीः काही नाही हो, झाडांना विकृत बनवतात!
पतीः अगं असं कसं? विकृत कसं म्हणतेस तू?
हाच संवाद मी प्रदर्शनातून बाहेर पडताना ऐकला आणि आपला प्रतिसादही वाचला. एवढंच की लोकांनी घरी बोन्साय वृक्ष ठेवावेत किंवा निषेध करून त्यांवर पूर्ण बहिष्कार घालावा असं मात्र मी बिलकूल सांगू इच्छित नाही. आवड असणाऱ्यांसाठी आणि इच्छा असूनही जाता न आलेल्यांना कल्पना यावी यासाठीच ती चित्रे होती.
बाकी क्रूरपणाचे तर जगात शेकडोंनी प्रकार आहेत , त्यातच हा एक! चालायचंच!