प्रदीपजींनी मतं नक्कीच कळकळीनं मांडली आहेत, पण तरीही ती त्यांची प्रामाणिक मतं आहेत. सर्वांनी मान्य करावीत अशी नक्कीच नाहीत. मा. सुरेश भटांनी गझलेसाठी आयुष्य वेचलं हे मान्यच. मलाही त्यांच्याबद्दल नितांत आदर आहेच; पण माझ्यासारख्या गजलकडे गांभीर्यानेच बघणाऱ्या कवीला स्वतःची मतं असू नयेत? गालिब मोठा शायर होताच आणि आहेच पण तरीही दुष्यंतकुमारसारखा कालानुरूप बदल करणारा शायर प्रसिद्ध झालाच ना? (कृपया हे उदाहरण समजावे, माझी या दोघांशी तुलना करण्याचा हेतू नाहीच, मी एक अगदी छोटा पण स्वतःचं अस्तित्व लेखनावाटे व्यक्त व्हावं असं वाटणारा शायर आहे.)

१. गजलेला गझल म्हणा किंवा गजल, मला दोन्हींत काही वावगं वाटत नाही. मुळात 'ज़' हे नुक्ता असलेलं व्यंजन मराठीत नाही. जर प्रत्येक ठिकाणी या 'ज़'च्या जागी 'झ' वापरायचा असेल तर 'झिंदगी', 'झमाना' का नको? तसंच 'ग़ज़ल'मधल्या 'ग़'मध्येही नुक्ता आहेच, मग 'घझल' का नको? मला वाटतं हे वादच अनाठायी आहेत. (अजूनही भारत, हिंदुस्तान असे दोन्ही उल्लेख लोक करतातच ना?)

.रसिक ही अशी चंचल चीज आहे की, त्याला एकाच वेळी हेही आवडेल आणि तेही आवडेल किंवा याच्या उलटही होऊ शकेल. आपण किती लोकानुनयी व्हायचे, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.... माझ्या मते तुकाराममहाराज, ज्ञानेश्वर यांनाही रसिकांनीच मोठे केले (समीक्षकांनी वा चर्चांनी नव्हे); म्हणजे ते काय लोकानुनयी कवीच होते?

३.कोणतीही गोष्ट रुजू लागली की तिची मुळे कमकुवत करणाऱ्या प्रवृत्ती सदासर्वकाळ सर्वत्र आढळतात.... गझलेला 'गजल' म्हटल्यामुळे किंवा माझ्यासारख्या काहींनी मक्ता लिहिल्यामुळे हा काव्यप्रकार कमकुवत होण्यासारखा आहे? यात प्रदीपजींनी गजलेच्या प्रभावी अस्तित्त्वाबद्दल आणि उज्ज्वल भविष्याबद्दलच भीती/शंका व्यक्त केली आहे!

असो. मीही अत्यंत मनापासून हे लिहीत आहे. माझं कुणाला पटावं असा आग्रह नाही. मी 'गजल' लिहिणं सुरूच ठेवीन. प्रदीपजींनी 'गझल' लिहावी. मी त्यांच्या गझला मनापासून वाचेन... पण वाद नकोतच.

धन्यवाद.
अजब.