अजब,
तुमच्या विचारांशी मी सहमत आहे. वाद नको म्हणूनच मी आतापर्यंत या "चर्चे"त भाग घेतला नव्हता. त्यामुळेच दोनदा प्रतिसाद टंकूनही सुपूर्त न करता पुसून टाकला. आधीच गझल/गजल हा प्रकार अनेक नियमांनी बद्ध आहे - वृत्त, अंत्ययमक, यमक, अलामत, मतल्यात दोन्ही ओळीत यमक व अंत्ययमक अनिवार्य असणे, प्रत्येक शेराचे स्वतंत्र अस्तित्व... या साऱ्यांचे पालन करता करता अनेकदा काव्याचा श्वास कोंडल्यासारखा होतो. ह्यात आणखीन नियमांची भर कशाला? तखल्लुस वापरणे / न वापरणे हे गझलकाराच्या इच्छेवर अवलंबून असते. त्यास तसेच राहू द्यावे.