प्रांजळ मतांबद्दल चित्त आणि फणसेंना धन्यवाद.

चित्त लिहितात...मला 'ग़जल' हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न मला 'प्रशस्त' वाटत नाही. मी गजल असे लिहिण्यात तो रूढ करण्याचा उद्देश वा प्रयत्न नाही, केवळ माझी आवड आहे. तसेच तखल्लुस लिहिताना ते 'घुसडावे'ही लागत नाही; सहज येते. (किंबहुना जिथे ते सहज येत नाहीये असे वाटले तिथे मीही ते कटाक्षाने टाळलेच आहे.)

आवडी-निवडी या खरोखरच चित्तनी म्हटल्याप्रमाणे ऐश्वर्या राय किंवा अलका कुबल अशा भिन्न-भिन्न असतात... आवडी कधीच पटवता/ लादता येत नाहीत... म्हणूनच आपण एकामेकांच्या आवडी-निवडीचा आदर करुया. (हे माझंही कळकळीचं मत.)

मत व्यक्त केल्याबद्दल पुनश्च आभार.
अजब.