तुम्ही म्हणता त्या प्रमाणे गझलेत सगळ्या ओळी सफाईदार आहेत खऱ्या! ...पण विचारात एक सरळसोटपणा आहे, तो नको असे म्हणायचे आहे काय?
असेच काहीसे अभिप्रेत होते. लॅटरल थिंकिंगचे भाषांतर आडवा विचार करणे असे केले.

उदा.:

सारखा बाजार उसळे वर तरी
घसरणारा खालती समभाग तू

ही द्विपदी वाचली की वाचकाला असे वाटू शकते, की येते, की समभाग हे यमक आल्यामुळे स्वाभाविकपणे बाजार आले आहे. ही स्वाभाविकता असणे चुकीचे किंवा वाईट नाही. ह्या स्वाभाविकता टाळून वेगळा विचार करून बघता येतो का हे बघावे. इतर संभावना, शक्यता पडताळून जोखून बघाव्यात. किंवा बाजार आणि समाभाग असले तरी त्यातही वेगळा विचार कसा करता येईल ह्याचा विचार करावा, शक्यता तपासून बघाव्यात. आणखी रंग भरता येतो का, आणखी छटा देता येतात हे पाहावे, असे मला वाटते.