श्री. पुष्कराज,
सप्रेम नमस्कार!
आपला प्रतिसाद विषयाला धरूनच आहे. प्रस्तुत लेखाची व्याप्ती संकुचित नक्कीच नाही आहे. 'उजवं-डावं करणं' हा मराठी वाक्प्रचार जो अर्थ प्रकट करतो तो प्रत्येक माणसाची कुठलीतरी एक 'कड' घेण्याची प्रवृत्तीच दर्शवितो. पाश्चात्यांचा स्वभाव हा वरील 'संकल्पनेनुसार' डाव्या मेंदूला, खरतरं एका विचार करण्याच्या पद्धतीला, धार्जिणा आहे. पौर्वात्य लोकांचा स्वभाव हा वरील 'संकल्पनेनुसार' उजव्या मेंदूला धार्जिणा आहे.
यावर आपलं मत काय?