नवरा-बायकोतील भांडणामुळे त्या दोघांचे मानसिक स्वास्थ्य तर बिघडतेच आहे; सोबत एका निष्पाप मुलाच्या नाजूक आणि संस्कारक्षम मनावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतोय.

'ऍप्रोचेबल' व्यक्तीशी संवाद साधून त्याला/तिला विश्वासात घेऊन योग्य मार्गदर्शन करणे, हेच काय ते तुम्ही करू शकता असे मला वाटते.

याउलट, पोलीस तक्रार अथवा सामाजिक संस्थांना परस्पर कळवणे जरा ऑफेंसिव (आक्रमक ?) वाटू शकते. आणि एकदा गोष्ट सार्वजनिक झाली की लोक त्या कोवळ्या जीवाला अनेक (नको ते) प्रश्न विचारून हैराण करतील ही भीती आहेच, आपण सगळे वृत्तवाहिन्या बघतोच!!

अर्थात, मूळ परिस्थितीपासून दूर राहून सल्ला देणे सोपे आहे. आपल्यासाठी हे फार अवघड काम आहे.

त्यासाठी शुभेच्छा!!