इकडे मला म्हणाले विसरून सर्व जा तू
अन् आठवांत रमले समजूत काढणारे
छान..छान...
सोडा स्मृतींबरोबर, त्यांना किती विनवले
हिंदीची छाप जाणवते या ओळीवर - उदाहरणार्थ ः मुझे तुम से कुछ भी ना चाहिए, मुझे मेरे हाल पे छोड दो
जखमेत मीठ तसले, समजूत काढणारे
मीठ जखमेत की जखमेवर ? शिवाय संपू्र्ण ओळच संदिग्ध वाटते...
सर्वांसमक्ष देऊ अश्रूंस वाट कैसी ?
हेही कुठे उमगले समजूत काढणारे
समजूत काढणाऱ्यांना हेही कुठे उमगले, असे तर म्हणायचे नाही ना, दुसऱ्या ओळीतून ? येथेही हिंदीचीच छाप - उदाहरणार्थ - मै समझा नही....च्या धर्तीवर जसे अनेकजण म्हणतात- मी समजलो नाही, त्याच धर्तीवर ते उमगले नाहीत..(त्यांना उमगले नाही, असे खरे तर हवे, होय ना ?)
सुटले मुखांस पाणी पाहून दुःख माझे
चघळावयास बसले समजूत काढणारे ...
छान आहे कल्पना...पण मुखांस पाणी मात्र खटकले.