तुम्हा जज्ज लोकांच्या डोक्याला कल्हई करायला पाहिजे एकदा, असे कल्हईवाला सत्र कोर्टाला म्हणाला.त्यामुळे न्हाव्याने लगेच गिऱ्हाईकाचा तुळतुळीत गोटा केला. गिऱ्हाईक सत्त्वर नाशकास गेले असता बामणाने त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला. बामण केसरीतर्फे काश्मीरास जाऊन आला होता म्हणून  विदुषकाने कसरत करणाऱ्या बाप्याला पिचलेल्या काठीने फटका दिला.