चित्त लिहितात...मला 'ग़जल' हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न मला 'प्रशस्त' वाटत नाही.
मी गजल असे लिहिण्यात तो रूढ करण्याचा उद्देश वा प्रयत्न नाही, केवळ माझी
आवड आहे. तसेच तखल्लुस लिहिताना ते 'घुसडावे'ही लागत नाही; सहज येते.
(किंबहुना जिथे ते सहज येत नाहीये असे वाटले तिथे मीही ते कटाक्षाने
टाळलेच आहे.)
प्रिय अजब, " मला 'ग़जल' हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न मला 'प्रशस्त' वाटत नाही," हे तुम्हाला उद्देशून नव्हते. तसे तुम्हाला वाटले असल्यास क्षमस्व! 'तखल्लुस घुसडण्याच्या' बाबतीतही हेच म्हणतो. आणि धन्यवाद कसले. तुम्ही मला माझे मत मागितले तर मी देणार नाही काय? तशी माझी ह्या बाबतीतली मते इथे (म्हणजे इथल्या काही गझलकारांना) माहीत आहेच, असे मला वाटत होते. त्यामुळे मी आधी चर्चेत पडलो नाही.