सर्वांचे खूप आभार...

मिलिंद : पाखरं अणी स्वप्नं ह्याबाबतीत तुमचे निरीक्षण अचूक आहे..  स्वप्ने ह्यात एक अवघडलेपण आहे उच्चारताना. त्यामुळे 'स्वप्नं' जवळचे वाटते.  ते तितकेसे पाखरे  आणि  पाखरं बाबतीत होत नाही आणि मी स्वतःतरी  बोलताना 'स्वप्नं' जितके सहजतेने वापरतो तेवढे 'पाखरं' नाही वापरत... 'पाखरे'च जास्त वापरतो...

चित्त : तुम्ही उदाहरण दिल्यावर 'आडवा विचार' म्हणजे काय हे नेमके समजले... नवीन गजलकारांसाठी अजून सविस्तर विवेचन दिलेत तर खूपच शिकायला मिळेल.. तुमच्या प्रतीक्रिया कायमच काही ना काही शिकवून जातात...

पण 'समभाग' शेराविषयी सांगायचे तर  समभाग काफिया वापरणे हाच एक आडवा विचार होत नाही काय? अर्थात गजलकाराने तिथेच न थांबता अजूनही शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत...

बाकी 'बाग', 'नाव' ह्या शेरांमध्ये तुम्ही म्हणता तसा विचार करायची गरज वाटते आहे.. ह्यावर नक्की विचार करेन