पण 'समभाग' शेराविषयी सांगायचे तर समभाग काफिया वापरणे हाच एक आडवा विचार
होत नाही काय?
वधू/वर निवडणे एक गोष्ट झाली, पहिली पायरी झाली. नेटका, चांगला संसार करणे ही दुसरी गोष्ट, असे मला वाटते. (ह्या दोन्ही बाबतींत माझा अनुभव शून्य आहे, ही वेगळी गोष्ट)
पण मिल्या तुमच्या सुपीक डोक्यात समभाग हे यमक आले. त्यासाठी तुम्हाला मानलेच पाहिजे. खरेच!!
आडव्या विचाराचे आणखी एक उदाहरण देतो. बशीर बद्रचा मला भरपूर आवडणारा शेर आहे:
दुनिया है बेपनाह तो भरपूर जिंदगी
दो औरतों के बीच में लेटा हुआ हूं में
ह्यातली खालची ओळ आडव्या विचारांचे उदाहरण आहे. दुसऱ्या ओळीमुळे द्विपदी कुठलाही धक्का न देता (विरोधाभास पैदा न करता) अगदी अनपेक्षित कलाटणी देते. अगदी वेगळ्याच दुनियेतून ही ओळ येते. आपल्याला ही वेगळी दुनिया शोधायला हवी.