"असंभव अ फ्लॅशबॅक...."
दिनांक १९ एप्रिल रोजी स्वरनगरी हाउसिंग सोसायटी आणि गोविंद कुलकर्णी ह्यांच्यातर्फे "असंभव अ फ्लॅशबॅक...." ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची प्रस्तुती थर्ड बेल एंटरटेनमेंट ची असून असंभव या मालिकेमधील प्रमुख अभिनेत्यांशी गप्पागोष्टी, मालिकेवर आधारीत प्रश्न व काही निवडक सादरीकरण असे ह्याचे स्वरूप असणार आहे. आजपर्यंतचा असंभव चा प्रवास.... त्यातील कलाकारांचे आपल्या व्यक्तीरेखेबद्दलचे विचार आणि काही निवडक प्रसंग देखिल सादर केले जाणार आहेत.... कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन स्वप्नील रास्ते ह्यांचे असून ते ह्या कार्यक्रमाचे निवेदन करतील आणि सर्व कलाकारांशी संवाद साधतील. कार्यक्रमात सादर केल्या जाणय्रा सर्व प्रसंगांचे दिग्दर्शन हे असंभव ह्या मालिकेचे दिग्दर्शक सतीश राजवाडे ह्यांचे आहे. सर्वसामान्य कल्पनांपलिकडील विषय असुनही आज सर्वात लोकप्रिय झालेल्या ह्या मालिकेबद्दलचे आपले विचार आणि अनुभव सांगण्याकरीता ह्या कार्यक्रमात आनंद अभ्यंकर,नीलम शिर्के,उमेश कामत,सतीश राजवाडे,शर्वरी पाटणकर, सुहास भालेकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. स्वरनगरी हाउसिंग सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड येथे हा कार्यक्रम ठिक रात्री ९ वाजता संपन्न होणार आहे.
प्रवेश विनामूल्य
संपर्क स्वप्नील रास्तेः ९८२२४२६२५४
आपले ह्या मालीकेबद्दल काही प्रश्न असतील तर लवकरात लवकर कळवा..... फोन वर अथवा प्रतीसादात. क्रुपया फोन केल्यास मनोगताचा संदर्भ द्या