http://www.manogat.com/node/13469#comment-115129

कविता उकलून सांगणे म्हणजे बुंदिचा लाडू चुरा करून खाण्यासारखे वाटते. तरीही वाचकांनी विचारले म्हणून सांगतो.

धरित्री मातेने तिच्या जन्मापासून आजपर्यंत मानवाला निसर्ग संपत्तीचे दान भरभरून दिले आहे. मानव सारासार विचार न करता ते दान दोन्ही हातांनी मुक्तपणे लुटत आला आहे. मानवासारखा आपमतलबी प्राणी ह्या जगात दुसरा कोणी नसेल. निसर्गाला आपल्या स्वार्थासाठी स्वच्चंदपणे  ओरबाडून घेतांना ह्या लुटीमुळे होणारी धरती मातेची हानी दिसत असुनही मानवाने नजरेआड केली आहे. निसर्गाए आक्रोश आम्हाला एकू येतात. ही लूट करतांना वाजणारी पाऊले आपलीच आहेत हेही कळते. पण आपण म्हणतो... "ही केवळ पर्यावरणवाद्यांनी निर्माण केलेली भुतेआहेत." निसर्गाचे कण्हणे किती दिवस आपल्या बहीऱ्या कानांवर पडणार? हा नाद, हा आक्रोश वाढत जाऊन एक दिवस त्याच्या ठणाणत्या  किंचाळ्या होतील. तेव्हा फार उशीर झाला असेल. निसर्गाच्या किंकाळ्या एकायला कुणीही उरला नसेल........