लेखमाला खूप छान! प्रवासवर्णन अप्रतिम. तुमचे मुद्दे १, २, ५, ६ थोडं, ७ थोडं याबद्दल मी पूर्ण सहमत आहे व त्यांचा जाब विचारण्याचा तुम्हास १०० टक्के अधिकार आहे. मात्र ३, ४, ८, ९ आणि थोडं ६ व ७ याबद्दल असहमत. ज्यांना सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे हव्या असतील त्यांनी स्वतःच individual पॅकेज घेवून प्रवास करावा. टूर कंपनी बरोबर जावून आपल्यालाच हव्या त्या गोष्टींची अपेक्षा करणे मला हास्यास्पद वाटते. ह्याचा अर्थ असा नाही की travel company ने काहीही करावे आणि तुम्ही चुपचाप भोगावे. त्यांची चूक तर आहेच, निर्विवाद! पण दोष दोन्ही बाजूला दिसतो. तुम्ही नकारात्मक दृष्टिकोन ठेवला की सगळंच चुकीचं दिसतं! honeymoon ला गेला काय किंवा चारधाम/काशी यात्रेला, वेळ पाळणे हे मूलभूत सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. तुम्ही भले वेळ अयोग्य आहे म्हणून आवाज उठवा पण उशीर करून (मुददाम नसला तरीही) लोकांना का त्रास? yes, it's losing money! because they lose time & time=money when one has limited time. एकंदरीत मला तुमची सहानुभूती वाटते. तुम्हाला अतिशय वाईट अनुभव आला. तुम्ही जर फक्त दोघांचच असं एक टूर पॅकेज + a personal guide घेतंलं असंतं तर खूप जास्त मजा केली असती असं मला वाटंतं. अशी package महाग नसतात! हया लेखाची दुसरी बाजू कळली असती तर बरं झालं असतं ('विचित्र प्रवाशांचे अनुभव from 'प'
). पण हे सारं लिहिल्याबद्दल शतशः धन्यवाद!!! जे मनापासून वाटलं ते प्रतिसाद म्हणून लिहिलं.(राग वाटून घेऊ नका)
प्रवासातील तुमच्या गैरसोयीबददल पूर्णपणे सहानुभूत. म्हणतात ना "केल्याने देशाटन, पंडितमैत्री सभेत संचार; मनुजा चातुर्य येतसे फार". तुमच्या अनुभवातून तुम्हीच नाही तर आणखीनही बरेच लोक आता चतुर होतील...