श्री.स्वप्नील रास्ते, दिग्दर्शक सतीश राजवाडे व अन्य कलाकारांना –
  आपण ‘असंभव’ सिरीयलवर आधारित मुलाखती व चर्चा करणार आहात. त्या संदर्भात खालील विचार मला सुचले ते कळवीत आहे.
१. कथानकातून अभिप्रेत पुनर्जन्म, भूतबाधा, परकायाप्रवेश या परामानसशास्त्रीय संकल्पनांना सध्याच्या वातावरणात इतक्या खुलेपणाने दाखवण्याचे साहस आपण करत आहात याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन.
२.  भुताटकीच्या कहाण्या बटबटीतपणे मांडणाऱ्या अनेक सीरियल्स आत्तापर्यंत पाहिल्या. ही सीरियल त्यापेक्षा वेगळी असल्याचे जाणवते.
३. पात्रांची निवड आणि अन्य तांत्रिक बाजू अत्यंत प्रगत आणि प्रभावी आहेत.
४. मालिकेच्या नावातून निर्माण होणारी उत्सुकता अद्याप टिकून आहे.
५. सिरीयल नियमित पाहणाऱ्यांच्या काही प्रतिक्रिया –
• कलाकारांची नावे फार भरभर स्क्रोल होतात. त्यामुळे अद्याप मानसी साळवी नंतर नायिकेचे काम कोण करत आहे हे माझ्या सकट कित्येकांना माहीत नाही.
• ‘असंभव’ असे काही घडत किंवा घडले आहे असे अद्याप वाटत नाही.
• महत्वाच्या वगळता अन्य पात्रांचे एकमेकांशीचे नाते संबंध त्यांच्या संवादातून ठळकपणे लक्षात येत नाहीत.
• दाढीवाल्या पात्राचे दर्शन सुखावह नाही व त्याच्याकडून कथानकाला कलाटणी मिळत नसल्याने कंटाळा वाढतो.
• नायकाचा विवाह घडण्याला कारणीभूत होणाऱ्या नायिकेच्या गानकलेचा संबंध नष्ट झाल्यात जमा आहे काय.
• नायक अप्रभावी होतोय. खलनायिकेचे कट-कारस्थान यशस्वी होताना दिसत नाही. वाड्यातील खजिन्याचे गूढ वाटेनासे झाले आहे.
• फाडलेला नकाशा व त्यातील गूढ संदेश प्रेक्षकांना न दिसल्याने त्याबद्दलची उत्सुकता वाटत नाही.
•  सिरीयलच्या एपिसोड एन्डशॉट्स धक्कादायक वाटत नाहीत.
    ६. नाडी ग्रंथ भविष्याबद्दल आपण ऐकले आहे? काय त्याचा आपणांस उपयोग करता येईल का        पहावे.
Email Id : दुवा क्र. १