लाल डबा म्हणण्यात अपमानास्पद काही नसावे असे मला वाटते.

मागच्या महिन्यात (पाचेक  वर्षांनंतर) लाल डब्याने पुण्याहून साताऱ्याला जायचा योग आला. वेगवान गाडी, पुरेशी आरामदायक, आणि स्वस्त. मजा आली प्रवासात. विशेषतः नव्या सुंदर रस्त्यांमुळे. माझी विमानात चिमुकली वाटलेली बॅग एस्टीत मात्र कुठेच मावेना. शेवटी बाकांच्या मधल्या मोकळ्या जागेत ठेवावी लागली. एव्हढा एक मुद्दा सोडल्यास पुण्यापर्यंत विमान व तिथून पुढे एस्टी हा पर्याय घरी जायला एकदम उत्तम आहे.