डोंबिवलीवरून पुण्याला जाणारी अति-आरामदायक बस फक्त सकाळीच निघते असे कळाले म्हणून एस टीने प्रवास करायला लागला. मोठमोठ्या बॅगा   जिथे प्रवासी उभे राहतात तिथे ठेवाव्या लागल्या. आधी थोडेसे उभे रहायला लागले, तरीपण एकूण प्रवास वेगवान झाला. पुण्यावरून येताना अति-आरामदायक बस मिळाली पण ती पुण्यातच एक तासभर फिरत होती त्यामुळे बसायला जागा असुनही खूपच कंटाळवाणे झाले होते. इतक्या वर्षानंतर केलेला एसटी चा प्रवासही चांगलाच वाटला. खरे तर मला एस टी चा प्रवासच जास्त आवडतो. पुरेशी आरामदायक, स्वस्त व मुख्य म्हणजे वेगवान असते.