जयंतराव,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
या कवितेचा विषयच एकसुरी आहे, त्यामुळे तुम्हाला तसे वाटणे अगदी साहजिक आहे.
मी तर म्हणेन की, ही कविता तुम्हाला नेमकी कळलेली आहे. सुख मिळविण्याची धडपड करत राहण्याइतके एकसुरी काम आयुष्यात दुसरे नाही... (तरी ते मिळत नाही ते नाहीच...! साऱ्या आय़ुष्याची गोळाबेरीज काय, तर हा एकसुरीपणा...!!!).
सुखाची भेट या रस्त्यावर नाही झाली तर त्या वाटेवर वाट बघा... या गल्लीच्या तोंडाशी नाही गाठता आले त्याला , तर त्या बोळात उभे राहून नजर ठेवा...असे सारखे चालू असते माणसाचे. मरेपर्यंत. ही तीच ती क्रिया एकसुरी न झाली तर काय नवल ?
हाच एकसुरीपणा पकडण्याचा प्रयत्न मी या कवितेत केला आहे. तुम्हाला तो अचूक समजला आणि या कवितेचे सार्थक झाले. आपण काहीएक कल्पना मनात ठेवून कविता लिहावी आणि ती कल्पना वाचकाला (आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ कवीला) नेमकी समजावी , याचा किती आनंद होतो, काय सांगायचे ? कवी या नात्याने तुम्हीही हा आनंद अनेकवेळा उपभोगला असेल...
प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.