आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या१ उन्हाची पौर्णीम रात झाली

आयुष्यरखरखाटा = आयुष्य हाच जो रखरखाट त्याचे संबोधन असा अर्थ घ्यायचा का? एकंदरच ही ओळ मला कळली नाही.

माध्यान्हिच्या असे रूप घेतले असते तर अडचण काय होती ते कळले नाही.

खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली

अजुनी ह्याचा अर्थ अद्याप असा घ्यायचा काय? आणखी, अधिक ह्या अर्थाने अजुनी वापरू नये असे वाटते. अजून हे कालदर्शक आहे.