महेश,
प्रतिसाद दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

आयुष्यरखरखाटा = आयुष्य हाच जो रखरखाट त्याचे संबोधन असा अर्थ घ्यायचा का?
- हो, असाच अर्थ अभिप्रेत आहे.

माध्यान्हिच्या असे रूप घेतले असते तर अडचण काय होती ते कळले नाही.
- 'माध्यान्ह' हे रूप आज मराठीत बऱ्यापैकी रूढ झालेले असले तरी मुळात ते 'मध्यान्ह' चा अपभ्रंश आहे. इथे पहा. तसेच अजूनही 'मध्यान्ह' हे शुद्ध रूप मराठीत वापरात आहेच, अपभ्रंशाने त्यास हद्दपार केलेले नाही. म्हणून मूळ शुद्ध शब्द वापरावा हेच मला योग्य वाटते.

...अधिक ह्या अर्थाने अजुनी वापरू नये असे वाटते. अजून हे कालदर्शक आहे.
- मान्य. ती ओळ
"खुलली सुवर्णकांती अधिकच मदालसेची"
अशी केली तर ? (ही तात्पुरती डागडुजी आहे. याहून समर्पक शब्द शोधायच्या प्रयत्नात आहे.)