श्री. अरूण मनोहर, नमस्कार!
आपल्याला माझे 'लिखाण आवडले' हे वाचून मला ही 'छान वाटले'. 'खुसखुशीत शैली' चं म्हणायचं झालं तर, ती राखून ठेवली एका विशिष्ट 'ध्येया' साठी. मराठी भाषेतील गोडवा टिकून राहण्याबरोबरच तिचा राज्यकारभारात रूक्ष वापर ही व्हावा या साठी 'संगणका' सारख्या माध्यमाचा वापर होणे गरजेचे आहे. सध्या आपण सगळे 'युनिकोड' लाच 'अंतिम तंत्रज्ञान' समजू लागलो आहोत. पाश्चात्यांच्या प्रवृत्तींनुसार ते अजून काही नवे 'तंत्रज्ञान' आणून आपण त्यानुसार बसविलेली घडी विस्कटून टाकणार. जसे काही वर्षापूर्वी अनेक भारतीय तंत्रज्ञांनी विविध वर्णाकार (फ़ाँट) बनविले होते. त्या कामात अनेक कंपन्यांचे कष्ट कामी आले होते. पण फक्त 'कळफलकाचे एकसमान' नसणे ह्या मुळे त्या कष्टाचे चीज झाले नाही. सर्वसामांन्य 'फुकट्या' मराठी लोकांना त्या नुकसानाचे काही वाटले नाही/ वाटणार नाही. पण एकंदरीत आपल्या समाजाचेच ते नुकसान आहे.
इंग्रजी भाषेचा कळफलक आजपर्यंत बदलण्यात आला नाही. पण मराठी भाषेचा 'कळफलक' सारखा बदलत राहतोय. याचे कारण मराठी भाषेच्या लिपीतील - जिला मी 'बाळबोध' म्हटले आहे, त्यात काळानुसार बदल न होणे हा होय. या संदर्भातील माझे विचार माझ्या संकेतस्थळावर मी मांडलेले आहेत. ते तुम्हाला आवडतील अशा 'खुसखुशीत शैली' नसून 'रहस्यमय शैलीत' मांडलेले आहेत. आपण भेट जरूर द्यावी, आपल्याला विषय, व त्यातील वैविध्य आणि सादरीकरण नक्की आवडेल याची मी खात्री देतो.
सादाला 'प्रतिसाद' दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार!
आपला विनम्र!
सतीश रावले