गालगाल गालगाल गालगाल गालगा ... हे वृत्त एका अर्थाने फार कठीण आहे असे मला वाटते. ('गागा' असा एखादा शब्द अनिवार्य असेल तर तो ह्या वृत्तात बसवणे अशक्य होते.) ह्या गझलेत मात्र सर्व शब्द सुंदर बसले आहेत.
प्रश्न हा विचारतात कुंपणांस कुंपणे-
राहतात माणसे अशी इथे घरे किती?
झोपड्यांत राहती गुरे म्हणे समोरच्या
आलिशान सदनिकांत ह्या जनावरे किती?
ह्या दोन द्विपदी एकामागून एक वाचल्यावर एखादा कूटप्रश्न आणि त्याचा उपप्रश्न किंवा प्रमेय आणि त्याच्या व्यत्यास एकामागून एक मांडल्यासारखे वाटले.
सदनिका हा शब्द वापरल्याचा आनंद झालाच; पण येथे बंगला जास्त बरा वाटला असता का?
आलिशान बंगल्यात ह्या जनावरे किती ... असा