गालगाल गालगाल गालगाल गालगा ... हे वृत्त एका अर्थाने फार कठीण आहे असे मला वाटते. ('गागा' असा एखादा शब्द अनिवार्य असेल तर तो ह्या वृत्तात बसवणे  अशक्य होते.) तुमचे म्हणणे खरे आहे. त्यामुळे.अनेक शब्द उपलब्धच नसतात.

...दोन द्विपदी एकामागून एक वाचल्यावर एखादा कूटप्रश्न आणि त्याचा उपप्रश्न किंवा प्रमेय आणि त्याच्या व्यत्यास एकामागून एक मांडल्यासारखे वाटले
.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुसरी द्विपदी पहिल्या द्विपदीचा व्यत्यास (किंवा प्रमेय किंवा उपप्रश्न) असल्यासारख्या आल्या आहेत. गझल सुचताना असे अनेकदा होते. अर्थात  प्रत्येक  द्विपदीचा स्वतंत्रपणे  आस्वाद घेणे शक्य आहेच. 

उदा.: अस्मादिकांच्या  आधीच्या एका गझलेत

तुझ्या अंगणातील चाफा फुलावा
मला गंधवार्ता कळावी स्वतःची

अशी ओळ वेचून घ्यावीस ओठी
खुशाली मलाही कळावी स्वतःची

अशा दोन द्विपदी आल्या होत्या. त्या आठवल्या.

सुरवातीला आलिशान बंगल्यात ह्या/बंगल्यामध्ये जनावरे किती .. असेच सुचले होते.  सदनिकांपुढे झोपड्या हे चित्रच दिसते, असे वाटल्यामुळे  सदनिका  आणल्या.