छायाताईंशी सहमत आहे. तसेच मला हे ही वाटते कदाचित असेही असू शकेल की खरेच त्यांना अशा कुणाची तरी गरज आहे शक्यतो त्रयस्थ व्यक्ती जी एका कोणाची बाजूच घेते असे होत नाही. साधारण याच अनुषंगाने सकाळमध्ये आजच चांगला लेख वाचला - विवाहपूर्व समुपदेशनाचा - कदाचित ते मदत करू शकतील, किंवा कोण मदत करू शकेल याची माहिती देऊ शकतील. त्यांचा फोन नं. एम इन्स्टिट्यूट (लक्ष्मी रोडवरील) २४४९५३०९/ ९७६६३२८१०९.
हा त्या लेखाचा दुवा दुवा क्र. १ आहे.
शेवटी असे म्हणावेसे वाटते की आपण झाली तर मदतच होईल या भावनेने करतो आहोत ते महत्त्वाचे, काही काळानंतर, वर्षानंतर असे वाटायला नको की आपण 'तेव्हा' काहीतरी करायला हवे होते. आशा आहे काहीतरी मार्ग निघेल.