उजेडात अंधारात,खोल खोल अंतरात
तेवतोय एकटाच एक दिवा!

वाव्वा! कविता फार आवडली.



अवांतर

उजेडात अंधारात,खोल खोल अंतरात
तेवतोय एकटाच एक दिवा!
तुझ्या-माझ्या भेटीसाठी अंतर्बाह्य काठोकाठी
भरतोय किरणांचा एक दुवा!

हवी हवी तुझी भेट,तुझ्याकडे येतो थेट
त्याचीच ही खूणगाठ-एक दिवा
दे रे दे रे भेट तुझी,वात छोटीशीच माझी
किंवा देई प्रकाशाचा जन्म नवा!

असे फॉर्म्याटिंग केल्यास वाचताना चांगले वाटते. तुमच्या इतरही कविता वाचल्या. एकंदर आवडल्या. शुभेच्छा!