> तिचे सतत उंच आवाजात बोलणे दिसते, पण नवरा हळू आवाजात जे बोलत असेल तेही तितकेच भयंकर असू शकेल.
मला तुमचे विचार खूप पटले. आपण सामान्यतः कुठल्याही घटनेचा एकांगी विचार करत असतो. नाण्याची दुसरी बाजू खूपदा लक्षात येत नाही.
समुपदेशन हा एक चांगला पर्याय आहे. त्रयस्थ व्यक्तीने सांगितलेले बरेचदा पटते. समुपदेशक हा दोघांसाठीही नवखाच असतो. कोणा एकाची बाजू घेऊन बोलणार नाही ह्याची दोघांनाही खात्री असते. त्यामुळे त्याची मते पटू शकतात.