तुमच्या प्रतिसादबद्दल आभार
हे अनुभव कोणाचीही सहानुभुती मिळवण्याकरीता नव्हे तर आमचा अनुभव मांडण्याकरीता लिहिले आहेत.हे प्रथम लक्षात घ्यावे असे वाटते.... आमच्या कोणत्याही वागण्याचे समर्थन मला कुणासमोरही करण्याचीही गरज वाटत नाही हा दुसरा महत्त्वाचा भाग. तुम्हाला पटले नाही हा तुमचा प्रश्न आहे. आणि इंडिविजुवल टुर बुक करा हा आपला सल्ला मिळाला ...सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे मिळाव्या अशी कुणाचीच अपेक्षा नसते.... कारण तसे होउ शकत नाही हे प्रत्येकाला कळते.... परंतु सांगीतलेल्या गोष्टी तरी पूर्ण मिळाव्या हि अपेक्षा असणे काहीही वावगे नाही..... ते ही फुकट नाही पूर्ण पैसे भरले आहेत म्हणून
honeymoon ला गेला काय किंवा चारधाम/काशी यात्रेला, वेळ पाळणे हे मूलभूत सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. तुम्ही भले वेळ अयोग्य आहे म्हणून आवाज उठवा पण उशीर करून (मुददाम नसला तरीही) लोकांना का त्रास? yes, it's losing money! because they lose time & time=money when one has limited time.
राहीली गोष्ट उशीर करण्याची..... तर माझे एकच म्हणणे आहे..... सकाळी लवकर उठवून दिवसाभरात दाखवण्यास तेवढी ठिकाणे असली तर लवकर उठून पर्यटनाला जाण्याची कुणाचीही तयारी असते.... पण दिवसाला २ स्पॉट सकाळी एक आणि संध्याकाळी एक असे पहायचे असतील आणि पूर्ण दुपार हॉटेल मध्ये बसून घालवायची असेल तर हे निःशंक मुर्खपणाचे आहे..... जेवणासाठी ४ तास प्रवास आणि दुपारी ४ तास हॉटेल मध्ये बसून घालवायचे पण सकाळी मात्र "हनिमून" टुर मध्ये ६ वाजता उठायचे असे जर कुणाला पटत असेल तर..... असो दिवसाला ८ तास असे घालवायचे आणि ते पण आपण पूर्ण पैसे भरुनही टुर कंपनी कंजुसपणा करून त्यांचे पैसे वाचवते आहे म्हणुन..... अशा सिचुएशन मध्ये आम्ही ५-१० मिनिटे उशीरा आलो म्हणून तुम्ही बोध देण्यासाठी लिहिलेली तुमची पुस्तकी वाक्य "yes, it's losing money! because they lose time & time=money when one has limited time." ह्यांना काडीमात्रही अर्थ उरत नाही..... फुकट घालवायला इतका वेळ होता की ..... ह्या अशा प्लॅनिंग ऐवजी जर ८ ला उठवून १० ला बाहेर पडलो आणि ६ किंवा ७ ला रुम मध्ये परत आलो ... तासभर आराम करून मग त्याच हॉटेल मध्ये जेवलो आणि मग आपल्या नव्या लाइफपार्टनर सोबत आरामात वेळ घालवला तर लोकांना हनिमून ला आल्यसारखे वाटेल आणि क्ष कंपनीला इतके पैसे भरल्याच सार्थक झाल्यासारखं वाटेल कारण ८ ते १२ आणि ६ ते ७.३० ह्या वेळात जे दाखवतात ते १० ते ६ वेळात नक्कीच दाखवून होउ शकते
अजून एक गोष्ट ... वेळ बदलून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही असे नाही...(जी एस तुम्ही अज्जुका आणि भटकळ ह्यांनी सर्व भाग नीट वाचलेले दिसत नाहीत भाग ४ आणि भाग ५)परंतू ३ जोडप्यांसाठी इतर १४ जोड्यांना मान्य असलेले असे मूर्खपणाचे प्लॅनिंग कोण कशाला बदलेल....? विनाकारण ४ तास रूम मध्ये बसवून कंपनीचे पैसे वाचत आहेत ना ....पण आम्ही वेळ बदलून घेतली त्या दिवशी इतर जोडप्यांनी जो आइतखाउ पणा केला आणि सगळीकडे हे बोलले की होतय ना काम मग आपण कशाला उगीच बोलायचं हा प्रकार केला..... हे सुद्धा मी लिहिले आहे....
हया लेखाची दुसरी बाजू कळली असती तर बरं झालं असतं ('विचित्र प्रवाशांचे अनुभव from 'प' ).
मी फक्त माझे अनुभव लिहिले.... मी कथाकार नाही की प ला काय वाटते ह्याचा विचार करून लिहीन ....तो करणे मला गरजेचे सुद्धा वाटत नाही ...चुकून "प" इथे असेल तर तिला कळलेच असेल की मी तिच्याबद्दल बोलते आहे. आणि खोटेपणा करून इतरांकडून फुकटचे पैसे उकळणाय्रांनी (प) इथे काहीही मत प्रकट केले तरी माझ्या लेखी त्याला काहीही महत्त्व नाही..... तिला प्रवाशांचे विचित्र अनुभव आले की नाही माहीत नाही पण हे मात्र नक्की की आमच्यासारख्या अनेक जणांना खोट्या किंमती सांगून तिने फसवले असेल.
असो.... तुमचे विचार तुमच्याकडे
मी फक्त एवढेच म्हणेन की अशा हनिमून चा अनुभव तुम्हाला आला असता तर कळले असते.... की आपला सुसंस्कृतपणा सगळीकडे दाखवून चालत नाही......