वा चित्तोपंत!

अप्रतिम गज़ल!!

याद आली श्रावणाची त्या तुझ्यामाझ्या पुन्हा
जाहले काळीज मोराच्या पिसाऱ्यासारखे

लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी
हुंदडावे वाटले आजन्म वाऱ्यासारखे

तारका, आकाशगंगा, चंद्र, उल्कांच्या सरी
शेवटी ब्रह्मांडही माझ्या पसाऱ्यासारखे

हे तीन शेर विशेष आवडले! शेवटचा शेर तर फार वरच्या उंचीला घेऊन जातो!!

आपला
(नतमस्तक) प्रवासी