वा...वा...वा...
थेट वेदकाळात नेलंत हां विसुनाना !
..........................
नवीन जीवन, नवीन मानव, सृष्टीही नवनवती
नवीन आतुन मनही - सारे नवीन अवतीभवती
सुंदर...
करित पाठ ऋग्वेदऋचांचा कुणी आहुती देती
मनामनातुन गुंजन करते 'ॐ शांती शांती '
ऋग्वेदांना ॐ मध्ये मात्र उगीचच अडकवलेत हां ... :)
आले कोठुन अंतरिक्ष, जल, - वायु, तेज अन धरती ?
- मग्न चिंतनी कुणी शोधतो विश्वाची उत्पत्ती
वा..वा...ऋषिमुनिवृंद डोळ्यांपुढे आला...
(वायु तेज नि धरती असे हवे)
***
जिथे वाहिली सिंधुसरिता अगाध पिकवित मोती
आमच्या पेशींमधली जनुके तिथे पोसली होती
वा...वेद आणि विज्ञान यांचा मनोज्ञ संगम !
(इथे मात्रापूर्तीसाठी धू दीर्घ पाहिजे. आमच्याऐवजी अमच्या किंवा अमुच्या हवे)
वाद घालतो "नव्हेच तुमची, ही तर आमची माती
वेगवेगळी आता लिहावी तुमची आमची खाती"
ॐ मधून बाहेर पडलात आणि हे बरीक खरे बोललात...:) खूपच छान !
(अमची किंवा अमुची हवे, आताऐवजी अता हवे )
दूर कुठेशी शांत झोपला घोडा माळावरती
इतिहासाचे देउन ओझे आमच्या खांद्यांवरती...
अंतर्मुख करणारी द्विपदी...अत्युत्तम.
(अमच्या किंवा अमुच्या हवे)
............
एकंदर छान रचना...वेदातील एखाद्या सूक्ताचेच पठण केल्यासारखे वाटले...शुभेच्छा.
अधूनमधून नको; तर वरचेवर येत जा, विसुनाना.