वास्तविक व्यासांना महाभारताचे २३व्यांदा पुनर्वाचन करून खूप कंटाळा आला होता. म्हणून त्यांनी थोडा वेळ चिमणीसोबत घालवावा असा विचार केला. तेव्हाच अचानक एक वासुदेव (गोकुळ मथुरेचा नव्हे, साधा शिखरशिंगणापूरचा...) आला आणि डुकराला म्हणाला, "भावोजी, मामंजीनी तुम्हाला श्रीमंतहार आतील तिजोरीत ठेवायला सांगितला आहे. वेळीच ठेवावा म्हणजे बरे!" हे ऐकून न ऐकल्यासारखे करत त्याने जेव्हा शनवारवाड्याच्या दिशेने एक कटाक्ष फेकला तेव्हा तो झेलता झेलता अनेकांच्या नाकी नऊ आले... हे (नाक्यावरच्या) वासूने चुकून 'नाकी मऊ आले' असे ऐकले आणि तो नाक्यापासून रावळपिंडीपर्यंत चालत निघाला...