नुकतेच स्वरनगरी हाउसिंग सोसायटी आणि गोविंद कुलकर्णी ह्यांच्यातर्फे "असंभव अ फ्लॅशबॅक...." ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तुती थर्ड बेल एंटरटेनमेंट ची असून असंभव या मालिकेमधील प्रमुख अभिनेत्यांशी गप्पागोष्टी, मालिकेवर आधारीत प्रश्न व काही निवडक सादरीकरण असे ह्याचे स्वरूप होते. कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि निवेदन स्वप्नील रास्ते ह्यांचे होते.... सर्वसामान्य कल्पनांपलिकडील विषय असुनही आज सर्वात लोकप्रिय झालेल्या ह्या मालिकेबद्दलचे आपले विचार आणि अनुभव सांगण्याकरीता ह्या कार्यक्रमात आनंद अभ्यंकर(दिनकर शास्त्री),नीलम शिर्के(सुलेखा /इंदुमती ),उमेश कामत(आदिनाथ / महादेव शास्त्री),सतीश राजवाडे(दिग्दर्शक असंभव आणि इन्स्पेक्टर विक्रांत भोसले),शर्वरी पाटणकर (प्रिया शास्त्री), सुहास भालेकर (सोपान आजोबा)हे कलाकार सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात असंभव च्या शिर्शक गीताने झाली. ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर आणि आनंद अभ्यंकर ह्यांनी दिपप्रज्वलन केले.  निवेदक स्वप्नील रास्ते ह्यांनी एकामागोमाग एक प्रश्न विचारून प्रेक्षकांची उत्सुकता खिळवून ठेवली.... ही मालीका अंधश्रद्दा, परकायाप्रवेश अशा गोष्टींना उत्तेजन देते आहे असे वाटत नाही का? डेली सोप म्हणून ही मालीका कितपत यशस्वी ठरेल? ह्या मालीकेसाठी टाइमस्लॉट मिळताना काही अडचणी आल्या का? असे अनेक प्रश्न स्वप्नील रास्ते ह्यांनी विचारले आणि त्यांची समाधानकारक उत्तरे कार्यक्रमाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे ह्यांनी दिली.

"तुझा सगळा अभिनय डोळ्यांमध्ये दडला आहे..... म्हणजे वर वर चांगले बोलून डोळ्यात सूडाचे किवा नकारात्मक भाव ठेवताना काय अडचणी आल्या?" असा प्रश्न निलम शिर्के हीला विचारला. "आदिनाथ शुभ्रा सोबत लग्न करून येतो त्या नंतर कालांतराने सुलेखा तिच्या मोठ्या बहीणीशी बोलताना ""मी त्याला माफ केले आहे"" असा डायलॉग म्हणायचा होता.....तेव्हा असे दाखवायचे होते की मी समोर चांगले बोलते आहे पण मनातून "तुला अस सोडणार नाही आदिनाथ"...मी आणि सतीश ने काही काळ चर्चा केल्यावर असे लक्षात आले की हा प्रकार आपण डोळ्यांनी नीट दाखवू शकु.... आणि त्या सीन मध्ये मला सुलेखा ची ही लकब सापडली..... सुरुवातीला वेळ लागत असे पण नंतर सवयीने जमू लागले "

तसेच उमेश आणि निलम ला कोणत्या व्यक्तीमत्वाचा अभिनय करताना सर्वात जास्त मजा येते असे विचारले असता निलम ला इंदुमती आणि उमेश ला महादेव साकारताना अधिक मजा येते असे त्यांनी सांगीतले. पूर्वी आपण अशा वेशातले आणि अशा प्रकारचे व्यक्तीमत्व कधीही साकारले नव्हते असे त्यांनी सांगीतले.

इतके वय असल्याने आपल्या घरच्यांनी सुरुवातीला आपल्याला सोपान ची भुमिका स्विकारण्यासाठी विरोध केलेला परंतु नंतर आपण त्यांना तयार करून ही भुमिका स्विकारल्याचे ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर ह्यांनी सांगीतले..... तसेच वयोमानामुळे सतत आपल्याला शूटिंग करणे शक्य होत नाही परंतु सर्व सहकलाकार आणि दिग्दर्शक ह्या बाबतीत आपल्याला संपूर्ण मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले....

माझी ही पहिलिच दैनंदिन मालीका असल्याचे शर्वरी पाटणकर हिने सांगीतले.... तर आनंद अभ्यंकर म्हणाले इतक्या वयस्कर व्यक्तीची भुमिका स्विकारणे हे माझ्यासाठी आव्हान होते.... तसेच ती साकारताना पार्किन्सन हा आजार असल्याप्रमाणे सतत मान हलती ठेवणे हे सुरुवातीला जड गेले.... मान हलती ठेवली की डायलॉग विसरायचे आणि डायलॉग लक्षात ठेवायला गेलो की मानेचे हलणे बंद व्हायचे असे सुरुवातीला अनेकदा झाले. 

लोकांनी पाठवलेले अनेक प्रश्नही स्वप्नील रास्ते ह्यांनी विचारले.प्रिया विक्रांत शी वाईट का वागते?, खजिना आहे का? कुठे आहे? सुलेखाचे पुढे काय होणार? स्वप्नील चे काय होणार? प्रथमेश बोलेल का? ह्या प्रेक्षकांकडून आलेल्या प्रश्नांवरून लोकांचे ह्या मालिकेवर आणि पात्रांवर असलेले प्रेम दिसून येत होते. 

सुहास भालेकर ह्यांनी सोपान चे निलम शिर्के ह्यांनी इंदुमती चे काही डायलॉग सादर केले तर आनंद अभ्यंकर ह्यांनी दिनकर आणि आदिनाथ ह्यांच्यात साकारला गेलेला एक प्रसंग सादर केला.... त्यात उमेश कामत ह्याने त्यांना साथ दिलि.

डॉ.दिलिप नहार ह्यांनी आपल्या पुनर्जन्माचा अनुभव कार्यक्रमाच्या निमित्ताने कथन केला.....  डॉक्टर असल्याने आपला ह्या गोष्टींवर विश्वास नसुनही ह्यातले सत्य शोधण्यासाठी नाडी ग्रंथ भविष्याच्या मदतीने आपण आपली पाळेमुळे कशी शोधून काढली ह्याचा त्यांनी उलगडा केला.

तरुण सोपान २० वर्षाचा असताना दिनू ६ वर्षाचा होता ...आज दिनू ८० वर्षाचा आहे पण सोपान ९४ वर्षाचा वाटत नाही.... हे कसे?, खोत कुठे हरवला, एक दोन पात्रांचा पुनर्जन्म समजू शकतो पण शुभ्रा, सुलेखा, आदिनाथ, प्रथमेश, डॉ. सामंत (पार्वती, इंदुमती, महादेव, गोदा, श्रीरंग)ही सगळीच पात्रे पुनर्जन्म घेउन परत भेटली हे अपचनीय नाही का? असे काही प्रश्न अनुत्तरीत राहीले.

प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि प्रचंड प्रतिसाद ह्याने गजबजलेला हा स्वरनगरी कलामंचावर उलगडलेला असंभव चा प्रवास पुढच्या भागाची उत्सुकता शिगेला नेउन पोहोचवणारा ठरला.....