खरचं चावून चावून चोथा झालेला हा विषय आहे. स्वतःच्या गोषात राहून दुसऱ्यांवर टिका करणाऱ्या मराठी लोकांन्नी आत्मपरीक्षण करावे व मुंबईमध्ये ही परीस्थिती का निर्माण झाली व ऊर्वरित महाराष्ट्रात पसरणाऱ्या या व्याधीला खतपाणी कुणी घातले हे तपासावे.

बव्हंशी मराठी माणसे ही चाकरमानी मानसिकतेची असतात व आपण बरे व आपले काम बरे या नादात असतात. ९ ते ६ ची नोकरी असावी, ती ही पांढरपेशा, दरमहा नियमीतपणे पगार यावा, शनिवार रविवार आरामात परिवारासह छोटी भ्रमंती व्हावी व यथावकाश निव्रुत्त व्हावे, बस्स्स!!! यापुढे जादा महत्वाकांक्षा नाही. हलकी सलकी कामे करायला दुसर कोणीतरी हवा असतो. दुसऱ्यांबरोबर (अ-मराठी माणसे) हिंदीत बोलण्याचा अनावर उत्साह तर ठायीठायी भरलेला आहे.

आपनच यान्ना बोलावतो व त्यांचे अनावश्यक लाड पुरवतो व नंतर त्यांचा त्रास व्हायला लागला के गळा काढतो. मतांसाठी हपापलेले राजकारणी तर अ-मराठी लोकांन्ना महाराष्ट्रात वसायला मदत करतात. या भय्यांच्या नावाने भीती घालून मते मिळवतात व नंतर मराठी लोकांना वाऱ्यावर सोडतात.

मला राज यांचे काही विचार पटले, तर काही पटले नाहीत. त्यांच्या आंदोलनातून काय शिकावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.