प्रलगो - तुमचा मनस्ताप समजू शकते, पण जेव्हा आपण बाकीच्या समुदायाबरोबर आहोत तेव्हा आपलेच म्हणणे खरे असे वाटूनसुद्धा तसे वागणे चालत नाही. याबाबतीत भटकळ यांच्याशी सहमत आहे. तसेच तुम्ही रोज उशिरा यायचे ठरवलेत हा जसा तुमचा प्रश्न आहे, तसाच बाकीच्या लोकांनी वेळेवर वा वेळेआधी यायचे ठरवले हा त्यांचा प्रश्न आहे, त्याबद्दल त्यांना नावं ठेवणे बालिशपणाचे वाटते (संदर्भ - बंगाली जोडपे). यावेळेस सर्वसाक्षींनी सांगितल्याप्रमाणे सामंजस्याने तुम्ही जर बाकीच्या लोकांना ऍप्रोच झाला असतात तर तुम्हाला कदाचित जास्त पाठिंबा मिळाला असता असे वाटते, अर्थात हे बोलणे सोपे आहे, याची मला कल्पना आहे. आपले अनुभव इथे लिहिल्याबद्दल आभारी आहे, कारण यातून बरेच काही कळते, काय काय गोष्टी आपण expect कराव्यात याचीही माहिती कळते. त्यांची वेबसाइट बघता त्यांनी दिलेल्या बऱ्याच गोष्टींना वेगळे पैसे लावले हे तुमच्या लेखातून कळले, हे संतापजनक आहे. मला वाटते तुम्ही अजूनही ग्राहक मंचात तक्रार करावी, आणि वाचकांच्या पत्रातही लिहावे, सध्या खूप मराठी बेबसाईटस झाल्या आहेत, त्यावर हा लेख कॉपी करून देता येईल. त्यांच्यापर्यंत याची माहिती गेली तर ते सुधारणा करतील, आणि कमीत कमी लोकांना अशा प्रकारचा अनुभव येणार नाही अशी आशा आहे. छाया राजे यांचा 'चांद मातला' लेख जरुर वाचा.

आम्हीपण काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका प्रसिद्ध कंपनीबरोबर दक्षिण भारताच्या टूरवर गेलो असताना टूर गाईडचा वाईट अनुभव आला. माझी तब्येत तिकडे गेल्यावर बिघडली, आणि तरीही त्याने लोक जास्त नाहीत म्हणून आयत्या वेळेस छोटी बस मागवून घेतली आणि जवळजवळ १५ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर परत १.५-२ तास स्टेशनवर वाट पाहायला लावले. बरोबर त्यांनी पुण्यातूनच आचारी नेला होता, त्यामुळे रोज सगळ्यांना मराठी जेवण मिळेल, पण आम्हाला त्याचा एक दिवसानंतर कंटाळा आला कारण घरी पण आपण पोहे-उप्पीटच खातो तर तिकडे जाऊन काहीतरी वेगेळे मिळेल असे वाटले होते - त्यामुळे तुम्हालाही किती कंटाळा आला असेल तेच-तेच जेवणाचा याचा अंदाज येतो. पण बाकीची सर्व लोक खूश होते फक्त आम्हा तीन जोडप्यांव्यतिरिक्त, तिथेही आम्ही तीन जोडपीच समवयस्कीन होतो , बाकी सर्व सीनियर सिटीजन होते. मला वाटले होते की या टुर मध्ये सीनियर सिटीजन जास्त असावेत कारण त्यांना जास्त धावपळ, जेवण, राहण्याची, बुकींगची पळापळ नको असते. पण तुमची हनीमून टूर असून सुद्धा तुम्हाला हा अनुभव यावा याचे आश्चर्य वाटले.