ओरिसातल्या बसेस आणि ट्रकवरची, समोरची आणि मागची रोषणाई ही खास पाहण्याची चीज आहे. रंगीबिरंगी एलईडी असे काही पेटलेले असतात की तारकादळांच्या तोंडात मारतील. बस किंवा ट्रक कितीही खटारा असले तरी ही रोषणाई पैसा वसूल असते. ट्रॅवल्सची नावं तर इतक्या भयंकर वेगाने स्क्रोल होत असतात की डोळे तिरळे होऊन जातात. त्याचा फोटो काढायचा राहून गेला ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
-सौरभ.