मिताली, अगदी तुमच्या गोष्टीसारखीच ती गोष्ट. फक्त तुमच्याबाबत शेवटचं तर तिच्याबाबत पहिलं अक्षर.
योगेश, श्रावणसर? नको रे बाबा. श्रावणच.
संजोप, काय राव तुम्ही? प्रतिसादातच इतकी नावं मला 'ठेवलीत' की बास्स. मजा आला.
अजानुकर्ण, त्या शीर्षकाचा लेख नाहीये पु.लं.चा. पण एका लेखात त्यांनी त्या प्रक्रियेविषयी लिहिल्याचं आठवतंय. तुम्ही म्हणता तो लेख नेमाड्यांचाच आहे.
पुनेरि जोशी, आडनावच मोडक. नुसता एक अनुस्वार त्या 'क'वर टाकला की सुरूच सारं काही. नावाची नाही, पण आडनावाची खूप झाली.